Posts

घाटंजीतील ६० शेतकऱ्यांना आधुनिक शेतीचे प्रशिक्षण

Image
 • तीन दिवसीय निवासी शिबिर उत्साहात घाटंजी | प्रतिनिधी कृषी विभाग, उमेद पाणी फाउंडेशन आणि नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित फार्मर कप 2026 अंतर्गत घाटंजी तालुक्यातील ६० शेतकऱ्यांसाठी तीन दिवसीय निवासी प्रशिक्षण कार्यक्रम उत्साहात पार पडला. हा कार्यक्रम दि. ३० मार्च ते १ एप्रिल २०२६ दरम्यान वरोरा येथील महारोगी संस्था येथे आयोजित करण्यात आला होता. प्रशिक्षणासाठी निवड झालेल्या महिला व पुरुष शेतकऱ्यांना तहसीलदार विजय साळवे व तालुका कृषी अधिकारी रंजना बोबडे यांच्या उपस्थितीत हिरवा झेंडा दाखवून रवाना करण्यात आले. या उपक्रमाला तालुक्यातील विविध भागांतील शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. तीन दिवसीय प्रशिक्षणात पीक पेरणीपूर्व तयारी, पाण्याचे शाश्वत व्यवस्थापन, माती परीक्षणाचे महत्त्व तसेच विविध पिकांवरील रोग व कीड नियंत्रण याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर शेती पद्धतीत आवश्यक बदल कसे करावेत, याविषयीही तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. याशिवाय आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा वापर करून उत्पादनवाढ कशी साध्य करता येईल, याचे प्रा...